Life Partner means..
नुकतच आनंदवन - हेमलकसा बघण्याचा योग आला आणि मन भारावून गेले.. Dr बाबा आमटे, विकास आमटे, प्रकाश आमटे हे नुसतच ऐकून,वाचून माहिती असण्यापेक्षा त्यांना भेटून त्याचं प्रत्यक्ष काम बघणं खूप वेगळं आहे.. हेमालकसा मध्ये Dr प्रकाश आमटेनी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.. इतके मोठे असून,कामात सतत व्यस्त असूनही त्यांनी त्यांचा खूप वेळ आम्हाला दिला.. नाहीतर आपल्या आजूबाजूचे लोक सारखे किती busy आहेत हेच दाखवत असतात.. त्याचं थोर कार्य सर्वश्रुत आहेच.. पण मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या कार्यात मोलाचा वाटा त्यांच्या पत्नींचा होता.. Dr प्रकाश आमटे सांगत होते कि त्यांनी लहानपणीपासून त्यांच्या आईवडिलांना (Dr बाबा आमटे आणि साधनाताई) रुग्णसेवा - सामाजिक कार्य करताना बघितले होते त्यामुळे नकळत त्यांच्यावर तसे संस्कार झाले होते.. पण त्यांची सहचारणी Dr मंदा आमटे या आपल्यासारख्या चौकटीत बसणाऱ्या घरातल्या होत्या.. त्यांनी MBBS केलं होता.. वेगळ्या कुठल्या मुलाशी लग्न करून पैसे कमवून चैनीत जगू शकल्या असत्या.. पण त्यांची प्रकाश आमटेंशी भेट झाली ती 'Love at first sight' अशी.. त्या आमटे कुटुंबियांच्या कार्यावर आधीच प्रभावित झाल्या होत्या.. कल्पना करून पहा आपण आपलं सगळं सोडून कधी दूर जंगलात आदिवासी लोकांची सेवा किवा अशा प्रकारची कामे करायला कायमचं जाऊ का आणि तेही मोफत सेवा !! पण सगळ्या संकटाना सामोरे जाऊन त्या दोघांनी शून्यातून हेमलकसा project उभा केला.. प्रत्येक पायरीवर मंदा आमटेनी प्रकाश आमटेंच्या बरोबरीन रुग्ण सेवा केली.. आताही गप्पा मारताना त्या बरोबर होत्याच.. त्या खऱ्या प्रकाश आमटे यांच्या अर्थाने life partner आहेत.. नाहीका.
आमच्या या tripचं विशेष म्हणजे 77 & 82 only - youngest couple बरोबर होतं.. वर्तक आजी आजोबा.. made for each other म्हणतात ना ते त्यांच्या सहवासात मनोमनी पटलं.. इतकं वय असलं तरी ते दोघं कोणावरही अवलंबून नव्हते आणि त्यांचा दांडगा उत्साह बघून आम्ही आवक झालो होतो.. ते आजोबा आजींची खूप काळजी घेत होते.. आजींसाठी बिनसाखरेचा चहा, त्यांची औषधे यावर त्यांचा बारीक लक्ष.. कायम दोघे एकत्र.. मग गम्मत म्हणून आमच्यापैकी बाकी senior मंडळी आजी आजोबांची खेचायचे.. आजोबाना सगळे म्हणत होते आजीचा बराच धाक दिसतोय तुमच्यावर तर ते म्हणायचे आजीचं खूप प्रेम आहे,धाक नव्हे.. मग मंडळी आजीना भरवू पहायचे तर आजी म्हणायच्या आजोबा माझ्यासाठी खूप प्रेमानी सगळं करतात.. मध्ये मी इतकी आजारी होते की जगण्याची अशा सोडून दिली होती तेव्हा आजोबांनी माझी खूप काळजी घेतली आणि त्यामुळे मी बरी झाले !!

जंगल सफारी मध्ये ते दोघं माझ्या जिप्सी मध्ये होते तेव्हा फार मजा आली.. कुठला प्राणी दिसला कि आजोबा आजीला बघायला सांगायचे.. आजोबा कधी उठून बघायला लागले की आजी त्यांना बसून पहा म्हणायच्या.. मध्ये एकीकडे दुसर्या जिप्सी मध्ये असलेल्या मंडळीनी आजोबाना थोडावेळ त्यांच्या गाडीत बोलावले.. तेव्हा आजीकडे प्रश्नार्थक नजरेने त्यांनी पहिले.. मग आम्ही त्यांना म्हणलं आजीची काळजी आम्ही घेतो, तुम्ही बिनधास्त जा तिकडे .. आजीपण म्हणल्या जा म्हणून मग शेवटी त्या गाडीत ते गेले.. तरीपण त्याचं सगळं लक्ष इकडेच.. एकदा सफारी सुरु झाली की सगळ्या गाड्या वेगवेगळ्या दिशेने जातात.. क़्वचित मध्येमध्ये कोणाची गाठ पडते.. तशीच आजोबांच्या गाडीशी आमची भेट झाली तेव्हा आजी आजोबांनी एकमेकांना लगेच हात केला, कदाचित सगळं ठीक आहे असं सांगत असावेत.. तेव्हा मला अगदी 'तू तिथे मी' चित्रपट आठवला.. तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात नाश्ता केला का, पाणी आहेना अशी विचारपूस केली..
असं हे प्रेमळ जोडपं बघून माझे डोळे भरून आले.. स्टेशन वरून निघताना आजी जवळ घेऊन मला म्हणाल्या 'लग्नाला बोलव हा.. तुझ्यासारखा चांगला मुलगा नक्की मिळेल हो तुला..' तेव्हा मला मनात वाटलं तुमचं एकमेकंवर जेव्हढ प्रेम आहेना तेव्हढ प्रेम देणारा आणि घेणारा , माझा आहे तसा मोकळेपणाने स्वीकार करणारा , आयुष्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत हात देणारा असा जोडीदार मला मिळावा.. आणि मग मीही प्रत्येक कार्यात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन.. :-)
ये जिंदगी तो वैसे एक सजा है..
साथ किसीका हो तो और ये मजा है..
किसी को प्यार देदे.. किसी का प्यार लेले..
इस सारे जमाने में यही प्यारी बात है..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा