ती : आज आपली शेवटची भेट .. पुन्हा काय माहिती कधी भेटू .. इकडे येणं झाला कधी तर मी नक्कीच भेटून जाईन पण पुढचं कोणाला माहिती .. मागचे सगळे दिवस माझ्या डोळ्यासमोर अगदी जसेच्या तसे आहेत अजूनही ... काही चांगलं घडल्यावर मी सगळ्यात आधी धावत तुला सांगायला यायचे .. आणि काहीतरी बिनसलं की मग तुझ्याजवळच यायचे .. माझ्याहातून काही चुकल्यावर तुझ्यापाशी चूक काबुल केली की मला फार बरं वाटायचं .. आणि काही होवो न होवो दर आठवड्यातली आपली भेट तर न चुकता व्हायचीच .. आता पुढे कसा व्हायचं माझं .. तिकडे दुसरीकडे माझं कोणी नसेल .. कोणापाशी मन मोकळं करेन मी काय माहिती .. तू माझ्यासाठी एव्हडं केलस आणि आज तुला द्यायला माझ्याकडे माझ्या असावान्शिवाय वेगळं काहीच नाहीये .. हे खारं पाणी गोड मानून घे तू ..
तो : अगं वेडे, रडतेस काय अशी तू .. इथे येऊन विश्वासाने तुझं मन मोकळं करायचीस .. खरतर तू स्वतःशीच मोकळी व्हायचीस, नाही का ? आपल्या भेटीची ही जागा एक निम्मित्त होतं .. मी तर कायम तुझ्या अंतरंगात असतो .. तू जिथे जशी तिथे मी तुझ्यासोबत आहे .. या ना त्या रूपाने मी तुझ्या सहवासात नेहमीच असेल .. तू जसं मानशील तसा मी आहे .. तू जिथे मानशील तिथे मी आहे .. तू मानलं तरी मी आहे आणि नाही मानलं तरी मी आहे हे कधीच विसरू नकोस तू!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा