एकदा माझ्या बिल्डींग मधील दोन मुले गच्चीत चेंडू खेळत होते.. खेळता खेळता
चेंडू खाली पडला.. तो घेण्यासाठी एकजण खाली गेला.. खाली पार्किंग वजा
बागीचा आहे.. कुम्पणात इकडे तिकडे चेंडू तो छोटु शोधू लागला.. पण काही
अंदाज लागत नव्हता.. शेवटी निराश होऊन त्याने वरती गच्चितल्या मित्राकडे
पहिले तेव्हा तो मित्र म्हणाला "अरे तू चुकीच्या बाजूला शोधतोयस.. बॉल तर
डावीकडच्या झुडापात दिसतोय,तो पहा तिकडे.." लगेच हा धावत गेला अन् चेंडू
हातात घेऊन म्हणाला "मला वरवरच दिसत होतं ,इतक्या आतले तुला तू उंचीवर
असल्याने दिसले.." अन् मग चेंडू घेऊन तो खुशीत पुन्हा खेळायला लागला..
आपलही असच असतंना.. आपली दृष्टी खूप संकुचित.. जे वरवर,बाहेरून दिसते त्यावर आपण विश्वास ठेवतो.. कधी निराश होतो तर कधी फसले जातो.. एकच बाजू माहिती असते आपल्यालला हे कदाचित सार्या दुखांचे मूळ असावे.. कधी कधी मनात खूप गोंधळ उडतो,काय चुक काय बरोबर समजेनासे होते अशा वेळेस फक्त आधार असतो तो सद्गुरू महात्म्यान्चा.. कारण त्यांना त्यांच्या अध्यात्मतील उंचीमुळे पुढचे मागचे, इकडचे तिकडचे सगळे न्यात असते.. त्यांना शरण गेले की चिंता कमी होतीलच असे नाही कारण प्रारब्धाप्रमाणे भोग तर सर्वांना भोगावेच लागतातना पण सगळं सहन करण्याची ताकद आणि सय्यम नक्कीच मिळतो.. ते आपल्याला विश्वास देतात की प्रत्येक गोष्टीमागे काही कारण आहे अन् जे होतय ते चांगल्यासाठीच.. स्वामी विवेकानंद यांनी म्हणले आहे..
God Gave Me Nothing I Wanted..
He Gave Me Everything I Needed.

२ टिप्पण्या:
Sundar
Dhanyavad :-)
टिप्पणी पोस्ट करा