मेघांचे जोरदार गरजणे..
विजांचे लखलख चमकणे.. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी..
पावसाचे रिमझिम बरसणे..
पाण्यात तरंग उमटणे.. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी..
फुलांचे मोहक बहरणे..
वेलींचे डौलदार झुलणे .. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी..
वाऱ्याचे सुसाट वाहणे..
शिखरांचे गगनास भिडणे.. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी
कोणाचे वादात पेटणे..
कोणाचे प्रीतीत वेडावणे.. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी..
प्रवास हा आंधळा खरा.. स्वतःस सिद्ध करण्यासाठी..
जो तो इथे धडपडतोय.. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी..!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा