मोठ्या बंगल्यामध्ये मालकाने पाळलेल्या मोतीकडे पाहून रस्त्यावरच्या टिपुला वाटले..
- किती नशिबवान आहे मोती.. ऐशोआरामात राहायचे.. मस्त मस्त पदार्थ खायचे.. सगळयांचे लाड करून घ्यायचे.. शिवाय मग मालकसोबत फिरायला जायचे.. आणि कोणी अनोळखी आले की जोरात भू भू करून मालकाला सांगायचे.. बास..
रस्त्यावर मुक्तपणे संचार करणार्या टिपुकडे पाहून बंगल्यातल्या मोतीला वाटले..
- आयुष्य असावं तर टिपुसारखं.. पाहिजे तेव्हा पाहिजे तिकडे भटकावं.. वाट्टेल ते शोधून खावं.. कुठे काही गडबड दिसल्यास पाठलाग करून पकडावं.. अजुन काय पाहिजे..
त्या दोघांकडे बघून मला वाटले..
- देवाने प्रत्येकाला काही जास्त आणि काही कमी दिले आहे.. परीक्षा तो सर्वांचीच घेत आहे तर.. संत तुकारामांनी म्हणले आहे.. "आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ।।"

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा