कधीतरी तुझ्या मनाची वही मागे उलटून पहा जरा..
कुठेतरी एखादे माझ्या नावचे पान नक्की सापडेल तुला..!
थोडं मळलेलं, थोडं फाटलेलं.. चुरगाळलेलं असेल जरा..
तरीही त्या पानामध्ये सुगंध ताजा जाणवेल तुला..!
कुठे पुसट.. कुठे अस्पष्ट.. जुनाट झालेले असेल जरा..
तरीही त्या पानामध्ये स्पर्श प्रेमाचा जाणवेल तुला..!
काही पाकळ्या.. काही जाळ्या.. आसवांची ओलही असेल जरा..
तरीही त्या पानामध्ये अस्तित्व माझे जाणवेल तुला..!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा