कुठे उंच उडणं.. कुठे खोल बुडणं..
कुठे शून्यात शिरणं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..
काही असं वाटणं.. काही तसं भासणं..
काही कसं निराळं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..
थोडं कोणाशी जुळणं.. थोडं काही सुटणं..
थोडं फार टिकणं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..
कोणास कौतुक तनाचं.. कोणास कौतुक धनाचं..
कोणास कौतुक मनाचं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..
कधी वाट मिळणं.. कधी वाट चुकणं..
कधी वाट संपणं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..
देवास त्या ओळखणं.. देवास त्या समजणं..
देवास त्या अनुभवणं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा