Attitude Sickness..
तिची अन माझी ओळख एका कॉमन मैत्रिणीमार्फत झाली.. एकदा माझी मैत्रीण माझा GM मेल वाचत होती तेव्हा 'ती' मला म्हणाली मलाही पाठवत जा तुझे मेल्स.. तसं पाहायला गेलं तर टीम मध्ये बऱ्याच मुली आहेत.. आम्ही सगळ्याजणी वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करतो तरी सगळ्यांची चांगली मैत्री आहे.. पण त्यात 'ती' जरा शिष्ठ वाटल्याने मी स्वतः कधी तिच्याशी बोलायला गेले नाही.. आता तीच म्हणत होती मेल्स पाठव म्हणून मग मी मग माझ्या यादीमध्ये तिचे नाव घातले.. सुरुवातीला तिचे छान म्हणून प्रतिक्रियादेखील यायची..
काही दिवसांनी टीममधल्या एकाचं तिच्याशी जमलंय असं ऐकण्यात आलं.. मला तर ही बातमी ऐकून छान वाटलं.. तो मुलगा चांगला आहे आहे अन हीपण दिसायला सुंदर,अनुरूप जोडा.. शिवाय आपलं आपलं लग्न ठरवणाऱ्यांच्या आई वडिलांना मुलांच्या लग्नासाठी चप्पला झीझवाव्या लागत नाही ही किती चांगली गोष्ट आहे हे मला हल्ली फार जाणवतं.. मला असं जमलं नाही याची खंत नेहमी वाटते.. असो.. तर त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चेचे वारे जोरात वाहू लागले.. अर्थात त्याला कारणीभूत तेच होते.. डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरीला काहीही वाटलं तरी जग तिच्याकडे बघतच असतं.. ही बातमी खरी चांगली होती पण त्याला उगाच वेगळं वळण लागलं.. त्या दोघांचं त्यांच्या रोजच्या जेवणाच्या ग्रुप मधल्या जवळच्यांशी वागणं बदललं.. कितीही चांगला नवरा मिळाला तरी मैत्रीण ही जीवाभावाची मैत्रीण असते हे समजण्याइतपत तिची कुवत नव्हती बहुतेक,कदाचित वयाने लहान असल्याने.. यथावकाश तिचं काही कारणाने माझ्या मैत्रिणीशी, आमच्यातल्या कॉमन मैत्रिणीशी भांडण झालं.. तिने त्यांचा लंच ग्रुप सोडला.. नाश्ता, जेवण, चहा सगळं त्याच्यासोबत.. गम्मत म्हणजे तिच्यासारखं त्यानेही बोलणं बंद केलं.. नंतर त्याने इन्फी सोडून दुसरीकडे नोकरी धरली... तेव्हा मग ती वेगळ्या मैत्रिणींसोबत जाऊ लागली पण थोड्या दिवसांनी तिचं त्यांच्याशीही पटेनासं झालं.. हळू हळू टीम मधल्या सगळ्या मुलींशी तिने बोलायचं पूर्णपणे बंद केलं.. ती एक सुंदर मुलगी.. फ्रेशर म्हणून लगेच पहिला जॉब इन्फी मध्ये मिळून एखादं वर्ष झालं असावं.. अशा मुलींच्या आसपास मुले नेहमीच घुटमळत असतात.. त्यामुळे आता ती त्या मुलांसोबतच असते पण आम्हा मुलीना मात्र ओळखही दाखवत नाही..
रोज सकाळी आम्ही एकाच वेळेस ऑफिस मध्ये येतो.. वॉशरूम मध्ये गेल्यावर नकळत मी अगदी रोज तिच्याकडे बघून एक स्माईल देत गुड मॉर्निंग म्हणते पण या madam च्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात, हास्य तर फार दूरची गोष्ट.. रोज असा अनुभव येऊनही पुन्हा तसंच घडतं..खूप सहजतेने एखाद्याकडे आपण हसून बघतो,शुभेच्छा देतोना.. they say "affection, openness and appreciation of qualities builds a long lasting relationship.." पण ती मात्र काहीतरी खुन्नस असल्यासारखी वागते.. आमच्यापैकी एकीच नुकतच लग्न झालं म्हणून स्वीट्स आणले होते तर जवळच्या क्युबिकल मध्ये बसूनही 'तिने' ना तिला शुभेच्छा दिल्या ना स्वीट्स घेतले.. अगदी पर्वाची गोष्ट.. रविवारी वाढदिवस झाला तर सोमवारी सगळे मला belated happy birthday म्हणत होते पण ती काही एका शब्दानेही बोलली नाही.. मी तर रस्त्यावरचा कोणाचा आज वाढदिवस आहे कळलं तरी त्याला शुभेच्छा देते.. कोणी शुभेच्छा दिल्या तर माझा वाढदिवस चांगला आणि नाही दिल्यातर खराब असं काही नसतं.. पण वाढदिवसाला शुभेच्छा देणे हा एक संस्काराचा भाग आहे.. पण यातही लोकं attitude दाखवतात.. यामध्ये कमीपणा वाटतो की काय माहिती नाही..
खरंतर माझं तिच्याशी कधीच काही भांडण झालं नाही.. आणि मी तिला त्याच्यावरून कधी काही विचारलं नाही ना कधी चिडवलं.. तरी ती माझ्याशीही अशी का वागते हा मोठा प्रश्न होता.. बर काही चुकलं असेल आमचं तर बोलून दाखवावं.. समोरच्याला कळावं तरी नक्की काय झालंय ते.. त्यावर माझी मैत्रीण स्पष्टपणे म्हणली की "तिच्या डोक्यात हवा गेली आहे सध्या.. वेळेवर नोकरी,पैसा, boy friend सगळं मिळालं आहे त्यामुळे ती माज करत आहे.. तूही तिला मेल्स पाठवायचे बंद कर".. त्यावर मी मैत्रिणीला म्हणलं.. "माझ्या gm मेल्स मध्ये बरेचदा सुविचार,ओव्या असतात.. त्या तिला जास्त गरजेच्या आहेत त्यामुळे ती जोपर्यंत मला म्हणत नाही की मेल्स पाठवू नको तोपर्यंत मी तिला पाठवणार.. भले ती मेल बघून डिलीट मारत असेल किवा अजून काय.. 'attitude sickness ' झालाय तिला, येईल कधीतरी जमिनीवर.. ती कितीही भाव खाणारी असली तरी मी किती हट्टी आहे हे तिला माहिती नाही.. एक ना एक दिवस माझ्या मेलला ती नक्की उत्तर देईल.. देखते है किसमे है कितना दम.."
एकंदरीत अशा लोकांकडे पाहून मला वाटतं भले मी सुंदर गोरीपान नाही, भले मला कॉलेज झाल्याझाल्या लगेच नोकरी मिळाली नाही,संघर्ष करावा लागला, भले माझ्या नावावर घर गाडी नाहीये, भले मला कोणी boy friend नाही,माझं लग्न वेळेवर झालं नाही.. पण काही नाही तरी माझ्या चेहऱ्यावर स्माईल तरी आहे.. कोणाला वाढदिवसाला ,लग्नाला शुभेच्छा देऊन त्यांच्या आनंदात सामील व्हायचे माझ्यावर संस्कार तरी आहेत.. कोणाचं मोकळेपणाने कौतुक आणि आदर करण्याइतपत मोठं माझं मन आहे.. कोणाला गरज असेल तेव्हा शक्य तेव्हढी मदत करायला माझ्याकडे वेळ आणि इच्छा आहे.. am truly luckier than her..

माना अपनी जेब से फ़कीर हैं फिर भी यारों दिल के हम अमीर हैं मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी जले बहार के लिये वो ज़िन्दगी किसी को हो न हो हमें तो ऐतबार जीना इसी का नाम है