शनिवार, १२ मार्च, २०११

मंतरलेले दिवस - १८

My Weekend  Evening Package!!! :))

पुण्यात उन्हाळ्यातला दिवस जरी जरा hot असला तरी संध्याकाळ हवीहवीशी असते.. सूर्य अस्ताला जाऊ लागतो तसा हवेत गारवा जाणवू लागतो.. आणि मग माझे पाय नकळत टेकडीच्या दिशेकडे वळू लागतात..

माझं  घर उजव्या भुसारी कॉलनी मध्ये आहे.. गल्ली बोळातून चालत चालत पौड रस्त्यावर येते तेव्हा गाड्यांची गर्दी चांदणी चौकाकडे धावत असते.. hmm.. weekend celebration!!! रस्ता ओलांडून डाव्या भुसारी कॉलनीत घुसते.. तिथे १० mins चाललं की माझं श्रद्धास्थान 'पूजा पार्क गणपती मंदिर' लागतं.. मंदिरात अजून तुरळक  गर्दीच असते.. हळूहळू भाविकांची विशेष करून लहान मुलांची रेलचेल सुरु होते.. मंदिरातलं ते प्रसन्न वातावरण आणि मंत्रमुग्ध करणारं सुमधुर संगीत.. कधीतरी एखादा भजनाचा नाहीतर भावगीताचा कार्यक्रम चालू असतो.. मनापासून नमस्कार करून दर्शन घेतलं की तिथल्या गुरुजीना नमस्कार करून प्रसाद घायचा.. मग त्यांचा नेहमीचा dialog   'अग तुझी मालिका सध्या बंद आहेका.. दिसत नाहीस हल्ली..' :)  यामागची गोष्ट अशी आहे की पूर्वी 'वादळवाट' नावाची मराठी मालिका खूप गाजली होती.. त्यातल्या heroin रमासारखी (अदिती सारंगधर ) मी दिसते आणि माझी personality तशीच आहे असं त्यांना पहिल्यापासून वाटतं.. :) एव्हढे वर्ष उलटले पण ते हा dialog न चुकता मारतात..  खूप दिवसात माझं तिकडे जाणं झालं नाहीतर आवर्जून विचारतात सगळं ठीक आहेना..

थोडावेळ तिकडे शांत बसून मग सरळ एकलव्य कॉलेजच्या पुढे चालत जाते.. भुजबळ townshipजवळून जाताना आमच्या बहिणाबाईंनी आम्हाला इथे पाहिलं तर काही खरं नाही असं वाटून वेग आपोआप वाढतो.. टेकडीवर जातेस आणि घरी येत नाहीस वगैरे वगैरे तिचे typical dialogs.. संध्याकाळी कोणाच्या घरी जाण्यापेक्षा मला मोकळ्या हवेत फिरायला जाम आवडतं.. मग कोणी बरोबर असो वा नसो.. mostly एकटीच असते आणि मला स्वतःला एकांत आवडतो.. कदाचित म्हणून मी कवयत्री असेल!!! कारण जितका वेळ तुम्ही स्वतःला देताल तितक्या तुम्हाला कल्पना सुचतात.. जमतंय तोपर्यंत जमतंय.. पुढचं पुढे..

महात्मा गांधी सोसायटीमध्ये आले की टेकडी दिसू लागते आणि त्याबरोबरच आजूबाजूस  नवीन बांधकाम चालू असतं.. लवकरच इथेही cementच जंगल होणार हे जाणवतं.. सुरुवातीला थोडा चढ असलेल्या या टेकडीवर वरती सपाट भाग आहे.. आणि चालण्यासाठी tracks केले आहेत..  कोथरूडच्या वेगवेगळ्या भागातून लोक या टेकडीवर येतात.. टेकडीवर वारं वाहत असतं.. कोणी jogging करत असतं.. कुठे बायका गप्पा मारत चालल्या असतात.. कोणी लहान मुलांना घेऊन आलेलं असतं.. तर कोणी अगदी मनापासून fast walk करत असतात..  मी सरळ सरळ चालत जाऊन टेकडीच्या दुसर्या टोकाला जिथून Bangalore highway दिसतो थेट तिथे जाते.. त्या ठिकाणी एक उंच खडक आहे ती माझी जागा.. तिथे उंचावर बसून टेकडीचे सौदर्य न्याहाळत बसते.. एकीकडे highway, दुसरीकडे डोंगराच्या मागे लपणारा सुर्योबा , तिसरीकडे गवत,   दूरवर सिंहगड आणि आकाशात घरट्या कडे परतणारे पाखरे.... माझा cell मूड प्रमाणे वाजत असतो..

जाएं तो जाएं कहाँ.. समझेगा, कौन यहाँ.. दर्द भरे दिल की ज़ुबाँ..
कही दूर जब दिन ढल जाये.. 
किंवा 
दिल है छोटासा.. छोटीसी आशा.. 
सांज ये गोकुळी..
वृन्दावनी सारंग हा का लावे घोर जीवाला..
आधी मूड कसाही असला तरी टेकडीवर आल्यावर 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असाच होतो एव्हढ मात्र १००% खरे.. मग नेहमीसारखं त्याच सूर्याचे त्याच ठिकाणून पुन्हा फोटो काढून सांजक्षण मनात साठवते.. हळूहळू सूर्य डोंगराआड लपू लागतो आणि मग मी मनात नसतानाही निघायचं ठरवते.. मनाने हट्ट केला तर त्यास मागची एक गोष्ट आठवून देते.. मानसी आणि मी एकदा या टेकडीवर चक्क हरवलो होतो.. अंधार झाल्याने उतरायची वाट सापडत नव्हती..सुदैवाने थोडा चांदणं होतं आणि दोघी सोबत होतो म्हणून एके ठिकाणी खाली उतरायचा रस्ता मिळाला होता पण आम्ही भलत्याच ठिकाणी पोहचलो होतो..एकट असताना असला प्रकार नको म्हणून मग परतीच्या प्रवासाला लागते.. 
नाही नाही गोष्ट इथे संपत नाही.. अर्धा तास चालून पुन्हा पौड रस्त्याला लागते आणि मग पाणीपुरीचे वेध लागतात.. त्याशिवाय आमचा वीकेंड जात नाही बुवा.. गणेश भेळ ची पाणीपुरी खाल्ली की मग दिल खुश होतं आणि पावलं आपोआप घराकडे वळतात.. 
भारी आहे की नाही माझं weekend package.. देवदर्शन + nature walk + music + पाणीपुरी..!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: