रविवार, २० मार्च, २०११

मंतरलेले दिवस - २०


संघर्ष कोणास चुकला ?
Life partnerचं महत्व आताशा कळू लागलंय.. पण मग वाटतं की सगळ्यांच्याच नशिबात असे चांगले जोडीदार मिळतीलच असं सांगता येत नाही.. प्रत्येक स्त्री 'सौभाग्यवती' होतेच असं काही नाहीना.. असे विचार चालू असतानाच रेडिओवर किशोरदांच गाणं लागलं.. 
" कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई..
तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई..
फिर क्यूँ संसार की बातों से, भीग गये तेरे नयना.. "
आणि मग मनात प्रश्न उमटला.. संघर्ष कोणत्या स्त्रीला चुकला???
सीतेच्या स्वयंवराची गोष्ट सर्वश्रुत आहे.. श्री रामाची पत्नी झाल्यावर तिला किती धन्य वाटले असेल.. पण लंका  प्रकरणानंतर तिला प्रजेच्या इच्छेनुसार वेगळं व्हावं लागल्यावर  आणि शेवटी स्वतःचं पावित्र्य सिद्ध करताना तिच्या मनाची स्थिती काय झाली असेल?   
राधा कृष्णाची जोडी म्हणजे शुद्ध प्रेमाचे प्रतिक.. राधेचं मन चोरलेला तो कान्हा जेव्हा गोकुळ सोडून जातो तेव्हा राधेची हालत कशी झाली असेल? कसं सावरलं असेल तिने मनाला? 
यज्ञ अग्नीतून प्रकट झालेली तेजस्विनी द्रोपदी.. पाच पती समोर असतना दुर्योधनाने भर सभेत तिच्यावर हात टाकला तेव्हा तिने काय दुखं भोगलं असेल? 
पांडू पत्नी कुंतीवर तिच्या मुलांच्या जन्मावरून भलतेसलते आरोप केले गेले तेव्हा तिची दशा कशी झाली असेल? 
या सर्वजणी तर देवीची रूपं आहेत.. तरी त्यांचं आयुष्य सोपं नव्हतं.. मग तुमची आमची तर गोष्टच निराळी..
बर गानसम्राज्ञी लता दिदींनी लग्न का नाही केले?  romantic गाणी गाताना त्यांच्या मनात लग्नाचे विचार कधी आले नसतील का? प्रेमाची जुनी गाणी evergreen सदाबहार आहेत.. ती गाणी म्हणताना त्यांच्या मनात कधी प्रेमाचा अंकुर फुटला नसेल का?
मराठी साहित्यातील रसिकप्रिय बहुश्रुत साहित्यिक म्हणजे शांता शेळके.. यांचं लग्न १६व्या वर्षी नावापुरतं झालं, पुढे टिकलं नाही..  तेव्हा अशा परिस्थितीतून हळुवार कविमनाला त्यांनी कसं सावरलं असेल? "ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा,माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?"  हे गीत त्यांना कधी कसं सुचलं असेल..
वेगवेगळ्या क्षेत्रात अशी अजून हजारो उदाहरणे आहेत.. या सगळ्यातून निष्कर्ष हा निघतो की या सर्व थोर स्त्रियांनाही बरंच सोसावं लागलं पण त्यांनी त्यांच्या आयुष्याचा उद्देश ओळखून त्या दिशेने वाटचाल केली.. त्या त्या क्षेत्रात त्यांनी उंची गाठली.. त्यांना त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ कळला होता.. 
या पार्श्वभूमीवर मी माझा विचार करते तेव्हा जाणवतं की मला एक मुलगी म्हणून कधी कधी वाटतं लग्न करून संसारात रमून जाऊ.. पण ती गोष्ट म्हणजे अभ्यास करून परीक्षा पास करण्यासारखी नाहीये.. मग वाटतं मनसोक्त भटकंती करूया.. कधी वाटतं अध्यात्माचा अभ्यास करावा,  meditation वगैरे करून स्वतःचा आणि परमेश्वराचा शोध घ्यावा.. पण ते वाटतं तितकं सोपा नाहीये,त्यासाठी गुरुकृपा आणि खूप मेहनत लागते.. तर कधी वाटतं चांगला वेळ आहे आपल्यापाशी तर social work करू ,"जनसेवा हीच ईश्वरसेवा!!".. करावं तर बरंच काही वाटत असतं पण एक निश्चित वाट मिळत नाहीये.. मन किती चंचल असतंना.. सतत वेगवेगळे प्रश्न मनात येत राहतात.. म्हणून  मलाही माझ्या आयुष्याचा जो काही उद्देश असेल तो आता लवकरात लवकर कळावा असं मनापासून वाटतं आणि त्यासाठी मी  ईश्वरचरणी प्रार्थना करते !!! 

बुधवार, १६ मार्च, २०११

मंतरलेले दिवस - १९

For every 'If condition' there must be an 'Else option'!!!

We always dream for something.. we make efforts in that direction and then expect the desired fruit.. sometimes dreams become reality.. but in some cases we can't achieve our target though we put 100% efforts honestly.. nobody is culprit in some situations but one has to suffer a lot.. then it comes to depression, loneliness,sadness.. and life becomes full of darkness..
To avoid this situation it is always better to keep an alternative for our dreams/goals..
 "i want this, i will try for it.. but if i can't get it, then i will try for another.. " Many people call "if i can't" thought as negativity.. it is not negative thinking at all.. it is just a way of keeping the power of hope in every circumstances..  For e.g. if u are looking for a job change.. u have applied in ur dream company and are preparing ur best for same.. if u neglect other jobs at that time and by hard luck u couldn't crack interview of ur dream company, at the end u will for sure get frustrated and hopeless.. but if u apply to many companies at a time, u will get more opportunities to prove urself.. 
In some situation alternatives are automatically available..for eg when a boyfriend ditches the heroin of film,2 other heroes will be in queue for giving her support..  but many times in our life we ourself need to find out the alternative paths.. with this 'else' condition, we can not avoid the sorrow and tears.. but yes it helps to come out from dark situation within short time and gives new hope for starting new life again.. :)

शनिवार, १२ मार्च, २०११

मंतरलेले दिवस - १८

My Weekend  Evening Package!!! :))

पुण्यात उन्हाळ्यातला दिवस जरी जरा hot असला तरी संध्याकाळ हवीहवीशी असते.. सूर्य अस्ताला जाऊ लागतो तसा हवेत गारवा जाणवू लागतो.. आणि मग माझे पाय नकळत टेकडीच्या दिशेकडे वळू लागतात..

माझं  घर उजव्या भुसारी कॉलनी मध्ये आहे.. गल्ली बोळातून चालत चालत पौड रस्त्यावर येते तेव्हा गाड्यांची गर्दी चांदणी चौकाकडे धावत असते.. hmm.. weekend celebration!!! रस्ता ओलांडून डाव्या भुसारी कॉलनीत घुसते.. तिथे १० mins चाललं की माझं श्रद्धास्थान 'पूजा पार्क गणपती मंदिर' लागतं.. मंदिरात अजून तुरळक  गर्दीच असते.. हळूहळू भाविकांची विशेष करून लहान मुलांची रेलचेल सुरु होते.. मंदिरातलं ते प्रसन्न वातावरण आणि मंत्रमुग्ध करणारं सुमधुर संगीत.. कधीतरी एखादा भजनाचा नाहीतर भावगीताचा कार्यक्रम चालू असतो.. मनापासून नमस्कार करून दर्शन घेतलं की तिथल्या गुरुजीना नमस्कार करून प्रसाद घायचा.. मग त्यांचा नेहमीचा dialog   'अग तुझी मालिका सध्या बंद आहेका.. दिसत नाहीस हल्ली..' :)  यामागची गोष्ट अशी आहे की पूर्वी 'वादळवाट' नावाची मराठी मालिका खूप गाजली होती.. त्यातल्या heroin रमासारखी (अदिती सारंगधर ) मी दिसते आणि माझी personality तशीच आहे असं त्यांना पहिल्यापासून वाटतं.. :) एव्हढे वर्ष उलटले पण ते हा dialog न चुकता मारतात..  खूप दिवसात माझं तिकडे जाणं झालं नाहीतर आवर्जून विचारतात सगळं ठीक आहेना..

थोडावेळ तिकडे शांत बसून मग सरळ एकलव्य कॉलेजच्या पुढे चालत जाते.. भुजबळ townshipजवळून जाताना आमच्या बहिणाबाईंनी आम्हाला इथे पाहिलं तर काही खरं नाही असं वाटून वेग आपोआप वाढतो.. टेकडीवर जातेस आणि घरी येत नाहीस वगैरे वगैरे तिचे typical dialogs.. संध्याकाळी कोणाच्या घरी जाण्यापेक्षा मला मोकळ्या हवेत फिरायला जाम आवडतं.. मग कोणी बरोबर असो वा नसो.. mostly एकटीच असते आणि मला स्वतःला एकांत आवडतो.. कदाचित म्हणून मी कवयत्री असेल!!! कारण जितका वेळ तुम्ही स्वतःला देताल तितक्या तुम्हाला कल्पना सुचतात.. जमतंय तोपर्यंत जमतंय.. पुढचं पुढे..

महात्मा गांधी सोसायटीमध्ये आले की टेकडी दिसू लागते आणि त्याबरोबरच आजूबाजूस  नवीन बांधकाम चालू असतं.. लवकरच इथेही cementच जंगल होणार हे जाणवतं.. सुरुवातीला थोडा चढ असलेल्या या टेकडीवर वरती सपाट भाग आहे.. आणि चालण्यासाठी tracks केले आहेत..  कोथरूडच्या वेगवेगळ्या भागातून लोक या टेकडीवर येतात.. टेकडीवर वारं वाहत असतं.. कोणी jogging करत असतं.. कुठे बायका गप्पा मारत चालल्या असतात.. कोणी लहान मुलांना घेऊन आलेलं असतं.. तर कोणी अगदी मनापासून fast walk करत असतात..  मी सरळ सरळ चालत जाऊन टेकडीच्या दुसर्या टोकाला जिथून Bangalore highway दिसतो थेट तिथे जाते.. त्या ठिकाणी एक उंच खडक आहे ती माझी जागा.. तिथे उंचावर बसून टेकडीचे सौदर्य न्याहाळत बसते.. एकीकडे highway, दुसरीकडे डोंगराच्या मागे लपणारा सुर्योबा , तिसरीकडे गवत,   दूरवर सिंहगड आणि आकाशात घरट्या कडे परतणारे पाखरे.... माझा cell मूड प्रमाणे वाजत असतो..

जाएं तो जाएं कहाँ.. समझेगा, कौन यहाँ.. दर्द भरे दिल की ज़ुबाँ..
कही दूर जब दिन ढल जाये.. 
किंवा 
दिल है छोटासा.. छोटीसी आशा.. 
सांज ये गोकुळी..
वृन्दावनी सारंग हा का लावे घोर जीवाला..
आधी मूड कसाही असला तरी टेकडीवर आल्यावर 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असाच होतो एव्हढ मात्र १००% खरे.. मग नेहमीसारखं त्याच सूर्याचे त्याच ठिकाणून पुन्हा फोटो काढून सांजक्षण मनात साठवते.. हळूहळू सूर्य डोंगराआड लपू लागतो आणि मग मी मनात नसतानाही निघायचं ठरवते.. मनाने हट्ट केला तर त्यास मागची एक गोष्ट आठवून देते.. मानसी आणि मी एकदा या टेकडीवर चक्क हरवलो होतो.. अंधार झाल्याने उतरायची वाट सापडत नव्हती..सुदैवाने थोडा चांदणं होतं आणि दोघी सोबत होतो म्हणून एके ठिकाणी खाली उतरायचा रस्ता मिळाला होता पण आम्ही भलत्याच ठिकाणी पोहचलो होतो..एकट असताना असला प्रकार नको म्हणून मग परतीच्या प्रवासाला लागते.. 
नाही नाही गोष्ट इथे संपत नाही.. अर्धा तास चालून पुन्हा पौड रस्त्याला लागते आणि मग पाणीपुरीचे वेध लागतात.. त्याशिवाय आमचा वीकेंड जात नाही बुवा.. गणेश भेळ ची पाणीपुरी खाल्ली की मग दिल खुश होतं आणि पावलं आपोआप घराकडे वळतात.. 
भारी आहे की नाही माझं weekend package.. देवदर्शन + nature walk + music + पाणीपुरी..!!!

मंगळवार, ८ मार्च, २०११

मंतरलेले दिवस - १७

Life Partner means..


नुकतच आनंदवन - हेमलकसा बघण्याचा योग आला आणि मन भारावून गेले.. Dr बाबा आमटे, विकास आमटे, प्रकाश आमटे  हे नुसतच ऐकून,वाचून माहिती असण्यापेक्षा त्यांना  भेटून  त्याचं प्रत्यक्ष काम बघणं खूप वेगळं आहे.. हेमालकसा मध्ये Dr प्रकाश आमटेनी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.. इतके मोठे असून,कामात सतत व्यस्त असूनही त्यांनी त्यांचा खूप वेळ आम्हाला दिला.. नाहीतर आपल्या आजूबाजूचे लोक सारखे किती busy आहेत हेच दाखवत असतात..  त्याचं थोर कार्य सर्वश्रुत आहेच.. पण मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या कार्यात मोलाचा वाटा त्यांच्या पत्नींचा होता..  Dr प्रकाश आमटे सांगत होते कि त्यांनी लहानपणीपासून त्यांच्या आईवडिलांना (Dr बाबा आमटे आणि साधनाताई) रुग्णसेवा - सामाजिक कार्य करताना बघितले होते त्यामुळे नकळत त्यांच्यावर तसे संस्कार झाले होते.. पण त्यांची सहचारणी Dr मंदा आमटे या आपल्यासारख्या चौकटीत बसणाऱ्या  घरातल्या होत्या.. त्यांनी MBBS केलं होता.. वेगळ्या कुठल्या मुलाशी लग्न करून पैसे कमवून चैनीत जगू शकल्या असत्या.. पण त्यांची प्रकाश आमटेंशी भेट झाली ती 'Love at first sight' अशी.. त्या आमटे कुटुंबियांच्या कार्यावर आधीच प्रभावित झाल्या होत्या.. कल्पना करून पहा आपण आपलं सगळं सोडून कधी दूर जंगलात आदिवासी लोकांची सेवा किवा अशा प्रकारची कामे करायला कायमचं जाऊ का आणि तेही मोफत सेवा !! पण सगळ्या संकटाना सामोरे जाऊन त्या दोघांनी शून्यातून हेमलकसा project उभा केला.. प्रत्येक  पायरीवर मंदा आमटेनी प्रकाश आमटेंच्या बरोबरीन रुग्ण सेवा केली.. आताही गप्पा मारताना त्या बरोबर होत्याच.. त्या खऱ्या प्रकाश आमटे यांच्या अर्थाने life partner आहेत.. नाहीका.


आमच्या या  tripचं विशेष म्हणजे  77 & 82 only - youngest couple बरोबर होतं.. वर्तक आजी आजोबा.. made for each other म्हणतात ना ते त्यांच्या सहवासात मनोमनी पटलं.. इतकं वय असलं तरी  ते दोघं कोणावरही अवलंबून नव्हते आणि त्यांचा दांडगा उत्साह बघून आम्ही आवक झालो होतो.. ते आजोबा आजींची खूप काळजी घेत होते.. आजींसाठी बिनसाखरेचा चहा, त्यांची औषधे यावर त्यांचा बारीक लक्ष.. कायम दोघे एकत्र.. मग गम्मत म्हणून  आमच्यापैकी बाकी senior मंडळी आजी आजोबांची खेचायचे.. आजोबाना सगळे म्हणत होते आजीचा बराच धाक दिसतोय तुमच्यावर तर ते म्हणायचे आजीचं खूप प्रेम आहे,धाक नव्हे.. मग मंडळी आजीना भरवू पहायचे तर आजी म्हणायच्या आजोबा माझ्यासाठी खूप प्रेमानी सगळं करतात.. मध्ये मी इतकी आजारी होते की जगण्याची अशा सोडून दिली होती तेव्हा आजोबांनी माझी खूप काळजी घेतली आणि त्यामुळे मी बरी झाले !!
जंगल सफारी मध्ये ते दोघं माझ्या जिप्सी मध्ये होते तेव्हा फार मजा आली.. कुठला प्राणी दिसला कि आजोबा आजीला बघायला सांगायचे.. आजोबा कधी उठून बघायला लागले की आजी त्यांना बसून पहा म्हणायच्या.. मध्ये एकीकडे दुसर्या जिप्सी मध्ये असलेल्या मंडळीनी आजोबाना थोडावेळ त्यांच्या गाडीत बोलावले.. तेव्हा आजीकडे प्रश्नार्थक नजरेने त्यांनी पहिले.. मग आम्ही त्यांना म्हणलं आजीची काळजी आम्ही घेतो, तुम्ही  बिनधास्त जा तिकडे .. आजीपण म्हणल्या जा म्हणून मग शेवटी त्या गाडीत ते गेले.. तरीपण त्याचं सगळं लक्ष इकडेच.. एकदा सफारी सुरु झाली की सगळ्या गाड्या वेगवेगळ्या दिशेने जातात.. क़्वचित मध्येमध्ये कोणाची गाठ पडते.. तशीच आजोबांच्या गाडीशी आमची भेट झाली तेव्हा आजी आजोबांनी एकमेकांना लगेच हात केला, कदाचित सगळं ठीक आहे असं सांगत असावेत.. तेव्हा मला अगदी  'तू तिथे मी' चित्रपट आठवला..  तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात नाश्ता केला का, पाणी आहेना अशी विचारपूस केली.. 
असं हे प्रेमळ जोडपं बघून माझे डोळे भरून आले.. स्टेशन वरून निघताना आजी जवळ घेऊन मला म्हणाल्या 'लग्नाला बोलव हा.. तुझ्यासारखा चांगला मुलगा नक्की मिळेल हो तुला..'  तेव्हा मला मनात वाटलं  तुमचं एकमेकंवर जेव्हढ प्रेम आहेना तेव्हढ प्रेम देणारा आणि घेणारा , माझा आहे तसा मोकळेपणाने स्वीकार करणारा , आयुष्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत हात देणारा असा जोडीदार मला मिळावा.. आणि मग मीही प्रत्येक कार्यात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन.. :-)

ये  जिंदगी   तो  वैसे  एक  सजा   है..
साथ  किसीका  हो  तो  और  ये  मजा  है..
किसी  को  प्यार  देदे.. किसी  का  प्यार  लेले.. 
इस  सारे  जमाने  में यही   प्यारी  बात  है..