उन्हाची वेळ अन् गर्दीचा रस्ता.. भल्याभल्यांनाही ट्रॅफिक चुकवता येत नव्हते..
बसमध्ये बसलेला कारवाल्याकडे पाहत म्हणाला यांचे बरे आहे,मस्त एसीत बसायचे.. कारवाला दुचाकीकडे पाहून म्हणाला ते बरय,कुठेही गाडी घुसवून काढायची.. दुचाकीवाला सायकलकडे बघत म्हणाला सायकल चांगली,जग थांबले तरी तिला कोणी थांबवत नाही.. सायकलवाला रस्त्यावरून चालत जाणार्या माणसाकडे बघून म्हणाला तो नशिबवान,सूटसुटीत आपले आपले चालत आहे.. चालणारा मनुष्य बसकडे पाहत म्हणाला अशा गर्दीत बसच बरी,उन्हाचा त्रास नाही,निवांत बसून जायचे..
खरच त्यावेळेस नक्की सुखी कोण होते? प्रत्येकात काही जमेच्या गोष्टी तर काही तोटे होते.. सर्वांना एकमेकांकडे पाहून हेवा वाटत होता.. कोणीच पूर्ण नव्हते..
अशात एका रीक्षेत छोटसं बालक आपल्या आईच्या मांडीवर निश्चिंतपणे बसले होते.. आईच्या हातातल्या बांगड्यांमध्ये खेळण्यात इतके गाढ रमुन गेले होते की जगाकडे त्याचे बिलकुल लक्षच नव्हते.. ते त्या क्षणी सावलीत आहे म्हणून सुखी नव्हते ना गर्दीत फसलो म्हणून वैतागले नव्हते ना एसी नाही म्हणून दुखी नव्हते.. त्याला कशाशीच घेणे देणे नव्हते..
त्याच्या चेहर्या होतं ते निखळ समाधान.. किती सुंदर दिसत होता त्याचा तो तृप्त चेहरा..
आईच्या कुशीत स्वताहाला झोकून देऊन निर्भयतेने वागणार्या त्या बालकासारखे आपण जर भगवंतांच्या सानिध्यात ,स्मरणात विसावलो तर समाधानाची गोडी आपणासदेखील चाटता येईलना?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा