नुकतंच सह्याद्रीमध्ये भटकून आले.. श्रावण महिन्यातला रिमझिम पाऊस आणि कोवळं उन्ह.. उंच कड्यावरून कोसळणाऱ्या शुभ्र जलधारा.. आणि मनाला ताजेपणा देणारा तो हिरवागार रंग.. निसर्गाच्या कुशीतून सुंदर प्रवास चालू होता.. तेव्हा लक्ष गेला ते भाताच्या शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांकडे..
पाणी भरपूर असल्याने काळ्या मातीतली पिके वार्यावर डोलत होती.. त्याभोवती निरुपयोगी वाढलेलं गवत ती लोकं काढत होते.. ते सुंदर शेत बघून मला क्षणभर त्या लोकांचा हेवा वाटला.. आहा.. किती सुखी आहेत ते लोक, त्यांच्या हिरव्यागार शेतात आनंदाने काम करत असतील.. पण मग लक्षात आलं कि ते शेत काही त्यांचंच असेल असं काही नाही.. दुरून आपल्याला वाटत त्या शेतात जे काम करत आहेत त्यांचंच ते शेत असावं.. खरंतर त्यांच्याकडून काम करून घेणारा मालक कोणी वेगळाच असतो.. मालकाने सगळी योजना आधीच आखून ठेवली असते.. कोण कधी कुठलं काम करणार.. कोणी नांगर फिरवायचा.. कोणी गवत काढायचं.. कोणी संरक्षण करायचं.. कोणी हिशोब ठेवायचा.. कोणी बाजाराचा काम करायचं.. इत्यादी.. काहीजण आपली कामे उत्तमरीत्या पार पडतात त्यांना पगारवाढ मिळते किवा पुढेमागे वरच्या दर्जाचा काम मिळतं.. काहीजण कामचुकारपणा करतात किवा कोणी चुकीची कामं करतात.. त्यांना वाटतं मालकाचा आपल्याकडे काही लक्ष नाही पण मालक मात्र सगळं काही पहात असतो आणि त्याप्रमाणे पाऊले उचलत असतो.. आज एखाद्याला गवत काढायचं काम मिळालं असेल तर त्याने हिशोब करणाऱ्याकडे पाहून रडत बसण्यात किवा स्पर्धेत पुढे जाण्यासाठी चुकीचा मार्ग धरण्यात काहीच अर्थ नाही.. पदरात पडलंय ते काम आनंदाने आणि प्रामाणिकपणे केलं कि पुढे मालक त्याची बढती नक्कीच करतो..
ते शेत, तिथले शेतकरी आणि त्यांचा मालक.. ते सर्व पाहून मला जाणवलं कि हे जग म्हणजे एक शेत आहे.. आपण सगळे शेतकरी, कामगार आहोत.. आणि तो एक भगवंत आपल्या सर्वांचा मालक आहे.. प्रत्येक जीवाला त्याने काही ठराविक काम वाटून दिलं आहे.. प्रत्येकाची उंची वेगळी आहे .. तो आपल्याकडून सगळं करून घेतो.. आपण फक्त निम्मित्तमात्र.. याचा अर्थ आपण चांगले प्रयत्न सोडून द्यायचे असा नाही.. पण प्रयत्नासोबत श्रद्धा असणं जरुरी आहे.. कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःशी आणि जगाशी प्रामाणिक राहिलं तर आजउद्या तो भगवंत आपल्याला योग्य न्याय नक्कीच देतोना.. चला तर मग असं करून पाहूया.. :-)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा