एक छोटी पोरगी.. निसर्गाच्या कुशीत रमणारी.. रोज एका बागेत जायची.. तिथल्या रंगेबिरंगी फुलापानाचा, पाखरांच्या किलबिलाटाचा, झुळझुळ झऱ्याचा, वाऱ्याचा आनंद ओंजळीत वेचत मनसोक्त फिरायची..
त्या बागेत बरीच उंच उंच हिरवीगार वृक्षे होती.. कोपऱ्यात असणारे ते एक झाड तिला नेहमी आकर्षून घ्यायचे.. झाडाला वरती बहरलेला सुंदर फुलांचा गुच्छ तिचं मन मोहवून टाकायचं.. तिला वाटायचं त्या फुलांना जवळून पाहावे, त्यांचा सुगंध घेऊन बघावा.. ती फांदी खाली ओढायचे खूप प्रयत्न करायची पण छे नाहीच, ती हाताला लागायचीच नाही.. कित्येकदा तिला खरचटायचं, लागायचं तरी ती उड्या मारून प्रयत्न करत राहायची.. शेवटी मग मन खट्टू होऊन तशीच परतायची.. जाता जाता देवाला म्हणायची, इतकी सुंदर निर्मिती आहे तुझी मग असं दूर का ठेवलंय माझ्यापासून..
असं बरेच दिवस चालू होतं.. पण एकेदिवशी त्या फुलांपाशी पोहचण्यात तिला यश आलं.. ती जाम खुश झाली.. पण फुलांना जवळून पाहताच तिच्या लक्षात आलं की वर वर दिसणारे हे झाड, ही फुले वेगळी आहेत आणि आतून तर झाडाला अन फुलांना कीड लागली आहे.. आता त्या फुलांना स्पर्श देखील करावा वाटला नाही तिला.. आपण त्या झाडावर किती प्रेम करत होतो आणि प्रत्यक्ष ते कसं निघालं हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं..
तिथून परतताना आज तिने देवाकडे मनापासून माफी मागितली.. ती फुलं आतून चांगली नाहीयेत म्हणून तिथपर्यंत जायचा रस्ता मला तो दाखवत नव्हता आणि मी मात्र त्यासाठी तक्रार करत होते.. आपली दृष्टी, विचार, कल्पनाशक्ती खूप संकुचित आहे.. आपण आपल्याला आवडतं ते मिळावं अशी इच्छा धरतो पण देव आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला देतो.. :)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा